PowerPoint Presentation

Published on Slideshow
Static slideshow
Download PDF version
Download PDF version
Embed video
Share video
Ask about this video

Scene 1 (0s)

प ंचगव्य. ले खक : कृषीमित्र सतीश सोनवणे मार्गदर्शक : डॉ. तेजस कोल्हे सहकार्य : अग्रोनॉमी टीम.

Scene 2 (9s)

पंचगव्य म्हणजे काय ? गाईपासून प्राप्त होणाऱ्या पाच पदार्थापासून बनविले जाणारे द्रावण म्हणजेच ‘पंचगव्य ‘ होय..

Scene 3 (18s)

फायदे: पिकाच्या उत्पादन तसेच गुणवत्ता वाढते. जमिनीमध्ये वापसा स्थिती टिकवून ठेवणे. पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे..

Scene 5 (32s)

साहित्य: देशी गाईचे शेण 7 किलो देशी गाईचे गोमूत्र 10 लिटर देशी गाईचे तूप 1 किलो देशी गाईचे दूध 3 लिटर देशी गाईचे दही 2 लिटर नारळाचे पाणी 3 लिटर गूळ 3 किलो पिकलेली केळी 1 डझन पाणी 10 लिटर.

Scene 6 (49s)

कृती: गाईचे शेण आणि तूप चांगले एकत्र करून ते 3 दिवस एकजीव होऊ दयावे. 3 दिवसांनी त्यामध्ये गोमुत्र आणि 10 लिटर पाणी मिसळून ते द्रावण 15 दिवस ठेवावे . या दरम्यान मात्र हे द्रावण नियमितपणे सकाळ आणि संध्याकाळी ढवळत जावे. 15 दिवसानंतर गाईचे दूध ,दही, नारळाचे पाणी, गूळ , बारीक केलेली केळी असे सर्व एकत्र करून घेणे व द्रावण चांगले ढवळून घ्यावे आणि पुढील किण्वन प्रक्रिया होण्यासाठी ते परत 15 दिवस ठेवावे , या 15 दिवसाच्या कालावधीत द्रावण नियमितपणे सकाळ व संध्याकाळ ढवळावे. (किण्वन क्रियेमुळे होणारा फेस पूर्णपणे खाली बसेपर्यंत द्रावण ढवळत राहावे) तयार झालेलं द्रावण हे जवळपास 6 महिन्यापर्यंत वापरता येते , फक्त काळजी एक घेणे यात साठवण करताना प्लॅस्टिक च्या भांड्याचा वापर करावा..

Scene 7 (1m 18s)

वापर: 10 लिटर पंचगव्य 400 लिटर पाण्यातुन 1 एकर साठी द्यावे. पिकाच्या मुळाजवळ शिंपडावे पण ते शिंपडताना जमिनीत वापसा असणे गरजेचे आहे..

Scene 8 (1m 28s)

धन्यवाद.