कोट्यवधी स्वामी भक्त दररोज श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष, नामघोष, नामोच्चार, नामस्मरण, जपजाप करीत असतात. श्री स्वामी समर्थ हा एक बीज मंत्र असून, त्याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या...

1 of
Published on Video
Go to video
Download PDF version
Download PDF version
Embed video
Share video
Ask about this video

Page 1 (0s)

कोट्यवधी स्वामी भक्त दररोज श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष, नामघोष, नामोच्चार, नामस्मरण, जपजाप करीत असतात. श्री स्वामी समर्थ हा एक बीज मंत्र असून, त्याचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या....

Page 2 (41s)

श्री स्वामी समर्थ षडाक्षरी स्वामी नाम 'श्री स्वामी समर्थ' हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्माण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे. ॐ नमः शिवाय, दूं दूर्गायै नमः, श्री गुरुदेव दत्त हे ज्याप्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत, अगदी त्याचप्रमाणे समानार्थी 'श्री स्वामी समर्थ' हाही सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र आहे. या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे अंतरीक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते, असा अनुभव आहे. या तारक मंत्राचा मतीतार्थ व्यवस्थित समजून घेऊन त्यायोगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्यययोग सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व आधिक प्रभावकारक होत असतो, अशी मान्यता आहे..

Page 3 (1m 7s)

श्री म्हणजे स्वयं श्रीपादविराजित सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज. स्वामी शब्दाची फोड केल्यास 'स्वाः + मी' अशी होते. स्वाः म्हणजे भस्म करणे अथवा आत्म समर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईर्ष्या. अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्वाः करा. तर, समर्थ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभु शिवत्व जागृत करा. त्यायोगे 'श्री स्वामी समर्थ' म्हणजे श्रीपादविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करुन स्वयंभु शिव तत्त्व सद्गुरुकृपे अंकित करा. हा श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा भावार्थ आहे..

Page 4 (1m 33s)

स्वामी सान्निध्यात येताच आपल्या अंतःकरणाचा कायापालट झाल्याशिवाय राहाणार नाही. असे हे दत्त स्वामी तत्त्व सर्व चराचर व्यापुनी उरले आहेत. सत् चित्त व आनंदाचे परम द्योतक स्वामी चरण अक्कलकोटी विराजलेले असून अशा परम गुरुच्या अमृतमय चित् पावन मंगलमय चरण कमळांनी आपल्याला वेदशास्त्र वेदोक्त ज्ञान व वेदांत वेदांच्याही पलीकडील सद्गुरु तत्त्वज्ञान सहजच होते. असे भक्तवत्सल स्वामी महाराज सदैव भक्तगणांवर कृपावर्षाव करोत, असे सांगितले गेले आहे..