रंगोत्सव सेलिब्रेशन २०१२ पासून भारतात कला स्पर्धा आयोजित करत आहे . शाळा तसेच विद्यार्थ्यांच्या मनात कला आणि सर्जनशीलतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आम्ही आता ती जागतिक स्तरावर नेत आहोत . “ रंगोत्सव सेलिब्रेशनची कल्पना माझ्या मनात का आली आणि ती स्पर्धा का आयोजित करण्यात आली . यामागे एक मोठं रहस्य आहे . एका घटनेने माझे आयुष्य बदलून टाकले ज्यामुळे एक रंगीत आणि उत्साही प्रवास सुरु झाला . एका कला स्पर्धेत मला प्रथम पारितोषिक मिळाले . मी उत्तेजित झालो . बक्षीस वितरण समारंभ १० दिवसांनी झाला . ते १० दिवस माझे मन आणि हृदय आनंदाने आणि उत्साहाने भरले होते आणि मी खूप रोमांचित झालो होतो . मी सतत विचार करत होतो की मला काय बक्षीस मिळेल , माझ्या कुटुंबाला किती अभिमान वाटेल आणि माझे मित्र काय प्रतिक्रिया देतील . त्या १० दिवसांचा आनंद मी अजूनही जपतो . हा आनंद आणि संधी प्रत्येक मुलाला मिळावी या विचाराने रंगोत्सव सेलिब्रेशनची स्थापना करण्यात आली . दरवर्षी आम्ही विविध शाळांमधील अनेक बालकलाकारांना त्यांच्या कलाकृतींमध्ये त्यांची सर्जनशीलता आणि वेगळेपण दाखवण्याची संधी देतो . मला मोलाचा पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा मी आभारी आहे .” धन्यवाद , संग्राम जी . दाते अध्यक्ष आणि संस्थापक.
Sangram G. Date Chairman and founder Pratirna Rao Dr.Væant (Non -.
रंगोत्सव आता कोणत्या टप्प्यावर आहे ? रंगोत्सव सेलिब्रेशन ची दृष्टी रंगोत्सव सेलिब्रेशन चे उद्देश्य कला शिक्षक आणि त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन.
Rangotsav Celebration Organization For National Level Art Competition.
रंगोत्सव सेलिब्रेशन जम्मू - काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत विविध शाळांमध्ये कला व हस्तकला स्पर्धेचे आयोजन करत आलेले आहे . रंगोत्सव सेलिब्रेशनच्या स्पर्धेमध्ये या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये १९६५ शाळांमधून ४ , ५० , ६२५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता . आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये ६६७ शाळांमधून ८१६५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता ..
आपल्याला भारतातल्या १५ लाख शाळांपर्यंत पो ह चायचं आहे . तसेच भारताबाहेर विविध देशातील विद्यार्थ्यांपर्यंत ही स्पर्धा पोचवण्याचं ध्येय आहे ..
usH. E:ar. 111b.. ."ill. BBB.
6! iiii. qa•sfiAD d. Rahul G. BBB. ST. XAVIER's HIGH SCHOOL.
प्रत्येक विद्यार्थ्यां मध्ये काहीतरी खास असतं . प्रत्येक विद्यार्थ्यात एक अशी कला लपलेली असते जी बाहेर काढणं आवश्यक आहे आणि रंगोत्सव सेलिब्रेशन च्या माध्यमातून ते व्यासपीठ त्यांना भेटणार आहे . त्यांच्या आत असलेला तो सुप्त गुण विद्यार्थ्यांच्या लक्षात आल्यानंतर तो विद्यार्थी त्याचा जीवनभर आनंद घेऊ शकेल ..
8t 3Vft. I II I I! i ill i i I i II I. abstract. qqo.
आज भारतातील ३० % ते ४० % शाळांमध्येच कलाशिक्षक आढळतो . बऱ्याच शाळांमध्ये कोणत्याही विषयाचा शिक्षक कला शिकवतो . परंतु खरंच त्या शिक्षकाकडे त्या गोष्टीचे ज्ञान असते का ? याचा विचार शाळा करत नाही . खरंच कलेला महत्व नाही का ? आपण जितके महत्व गणित , इतिहास , भूगोल , मराठी ,_______ या विषयांना देतो तेवढे महत्व कला विषयाला का देत नाही , खरंच या विषयाला इतके मागे का ठेवले आहे . ज्या विषयामुळे मुलांच्या आत असलेले सुप्त गुण बाहेर येतात , मुलांची एकाग्रता वाढते अशा विषयाला खरंच भारतामध्ये किती महत्वाचं स्थान आहे यासाठी आपल्या सर्वाना मिळून अशा विषयाला महत्व देणे आवश्यक आहे . एक कला शिक्षक असलेली शाळा व कला शिक्षक नसलेली शाळा याना जर आपण भेट दिली तर आपल्याला तो फरक नक्कीच जाणवेल . त्या शाळांतील मुलांमध्ये सर्जनशीलता , सामर्थ्य , वेगळेपणा लगेच जाणवतो . कारण कला या विषयाच दुसरं नाव आनंद आहे . हीच मुले भविष्यात विविध आविष्कार घडवून भारताला उंच स्थानावर नेण्यास सक्षम बनवतात . रंगोत्सव सेलिब्रेशन च्या माध्यमातून भारतातील कानाकोपऱ्यात असलेल्या शाळांमध्ये कला शिक्षक असायला हवा असे रंगोत्सव सेलिब्रेशन ला वाटते त्यासाठी रंगोत्सव सेलिब्रेशन प्रयत्न करेल आणि त्याचे महत्व पटून देईल . आजही कला शिक्षकाला विशेष महत्व आहे कारण त्याच्यामुळे शाळेतील सर्जनशीलता बाहेर पडते व ती शाळा किती सर्जनशील आहे हे जगास समजते ..