जीवामृत. लेखक: कृषीमित्र सतिश सोनवणे मार्गदर्शक :डॉ तेजस कोल्हे सहकार्य: ॲग्रोनॉमी टीम.
जमिनीमध्ये अन्न द्रव्याचा साठा विपुल प्रमाणात असतो परंतु हि अन्नद्रव्ये पाहिजे त्या प्रमाणात पिकाला उपलब्ध होत नाही , हि अन्नद्रव्ये जर पिकाला उपलब्ध करून देय ची असतील आणि जमिनीतील जीवाणूची संख्या जर वाढवायची असेल तर आपल्याला जीवामृत वापरणे गरजेचे आहे ..
साहित्य : १) देशी गाईचे शेण १०किलो २) देशी गाईचे गोमुत्र ५-१० लिटर ३)गुळ १ किलो/ उसाचा रस ४ लिटर ४)बेसन पीठ १ किलो ५)बांधावरची माती किवा झाडाच्या मूळावरील माती १ मूठ ६)काठी ७)गोनपाठ ८)पाणी २०० लिटर ९)प्लास्टिक ची टाकी २ ०० लिट र.
कृती :. सर्व प्रथम शेण ,गोमुत्र ,बेसन ,गुळ,बांधावरची किंवा मुळावरची माती हे सर्व एकत्र करून एकजीव करून घ्यावे. त्यानंतर २०० लिटर पाणी मध्ये हे मिश्रण टाकून ते घड्याळाच्या दिशेने फिरवावे . दिवसातून २ वेळेस म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ हे मिश्रण २ मिनिटे ढवळत जावे आणि ढवळून झाल्यावर ते गोणपाट टाकून झाकावे जीवामृत तयार करताना काळजी एक घ्यावी की ते उन्हात राहता कामा नये ८दिवस किण्वन क्रिया चालल्यानंतर जीवामृत तयार होते . महिन्यातून एकरी २०० लिटर दर १५ दिवसांनी किंवा ४०० लिटर १ वेळा पिकांना देणे . जीवामृत वापरण्याचा कालावधी हा फक्त ९ते 10 दिवस आहे..
गोमुत्र का वापरावे आणि या मध्ये घटक कोणते असतात ? नत्र ,स्फुरद ,पालाश , अमोनिया ,गंधक , लोह ,तांबे ,मँगनीज ,सुवर्णक्षार तसेच अन्य खनिजे असतात अमोनिया गॅस , मीठ , कार्बोनिक आम्ल , संजीवके व असंख्य जीवाणू असतात. गोमुत्र हे उत्तम बुरशीनाशक तसेच संजीवक म्हणून चांगले काम करते. *देशी गाईचे शेण हे सुद्धा उत्तम बुरशीनाशक तसेच संजीवक म्हणून चांगले काम करते..
बांधावरची माती किंवा मुळावरची माती का घ्यावी ? कारण किण्वन क्रीयासाठी जी बुरशी आणि जीवाणू लागतात ते यामध्ये असतात त्यामुळे किण्वन क्रिया चांगली होती. तसेच मुळावरच्या मातीत नैसर्गिक रित्या अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणारे जीवाणू असतात ..
गुळ = यात गुळाचे कार्य खूप महत्वाचे आहे कारण जीवाणूच्या संख्येत(Multiplication) वाढ करण्याचे काम गुळ करते . *बेसन/ कडधान्य पीठ = बेसन जीवाणूचे खाद्यपदार्थ म्हणनू काम करते , त्या मुळे जीवाणूच्या संखेत वाढ होते...
जीवामृतच्या फवारण्या का ?. 1) जीवामतृ हे जिवाणूंचे विरजण आहे व सोबतच ते अत्यंत चांगले बुरुशिनाशक ,विषाणूनाशक आहे. त्यामुळे त्याच्या फवारणीने बुरशी आणि विषाणू प्रादुर्भाव आटोक्यात येते..
कोणत्याही झाडाचे एक चौरस फुट पान प्रकाश संश्लेषण क्रीयेद्वारा सूर्यप्रकाशातून फोटोन कणाच्या रुपात एकादिवसात 12.5 किलो कॅलरीज गोळा करते. सोबतच मुळांनी जमिनीतून घेतलेल्या पाण्याशी व पानांनी घेतलेल्या कर्बाल्म सोबत रासायनिक संयोग होऊन त्यापासनू 4.5 ग्रॅम अन्ननिर्मिती होते. संध्याकाळी त्या अन्नाची विल्हेवाट लावली जाते . त्यापैकी काही अन्न मुळा वाटे जमिनीतील जीवाणूला खाऊ घातले जाते आणि काही अन्न श्वसनासाठी खर्च हो ते तर काही अन्न दुसऱ्या दिवशी झाडाच्या वाढीसाठी खर्च हो ते व शिल्लक राहिलेले अन्न दाण्याचे पोषण तसेच शेंगा व फळाचे पोषण होण्यासाठी वापर ले जाते ..
फळ झाडांना जीवामृत देण्याच्या मात्रा पुढीलप्रमाणे :.
धन्यवाद.